Uncategorized

मोठी बातमी ! शाळा कधी सुरू होणार? अखेर तारीख जाहीर; विदर्भाला वाढीव सुट्टी, तर उर्वरित महाराष्ट्राचे काय?

 

मुंबई -उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे संपूर्ण राज्याला शाळा कधी सुरू होणार, याची उत्सुकता लागली होती. अखेर या संदर्भातील महत्त्वाची आणि अधिकृत माहिती समोर आली असून महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शाळा सुरू होण्याच्या निश्चित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी हवामानातील बदल आणि कडक ऊन लक्षात घेऊन शासनाने विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी दोन वेगवेगळे वेळापत्रक निश्चित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

विदर्भातील शाळांना एक आठवड्याची वाढीव सुट्टी

विदर्भ प्रांतातील वाढते तापमान आणि उन्हाची तीव्र लाट लक्षात घेता, उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाढवण्याबाबत आणि शाळा उशिरा सुरू करण्याबाबत न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. केवळ विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवारी 22 जून 2026 पासून सुरू केल्या जातील. म्हणजेच विदर्भातील शाळांना आणखी एक आठवड्याची वाढीव सुट्टी देण्यात आली आहे.सध्याचे तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि सुदृढतेसाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यासोबतचं विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात सुरु होणार…. मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला..

उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासून नियमित शाळा
शिक्षण आयुक्तांच्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी विशेष सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यातील सर्व शाळा पूर्वघोषित वेळापत्रकाप्रमाणे सोमवार 15 जून 2026 पासून नियमित वेळेत सुरू होणार आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​