Uncategorized

गोकुळच्या राजकारणात नवा अध्याय

                               गोकुळच्या राजकारणात नवा अध्याय

गडहिंग्लज : गोकुळ दूध संघाच्यानिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचाली बेगावल्या असताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागणाऱ्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी येत्या दोन दिवसांत मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा करु. समाधानकारक प्रतिसाद मिळाल्यास ठिक अन्यथा आमचा निर्णय आम्ही घेऊ असे भडगाव येथील कार्यक्रमा दरम्यान बोलताना व्यक्त करत आमदार पाटील यांनी दोन्ही बाजू खुल्या ठेवल्या आहेत.

गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटली असताना मंत्री मुश्रीफ यांनी भाजप संपवण्यासाठी काम केल्याचा आरोप करत त्यांच्या कारभारावरविविध ठिकाणी आमदार पाटील यांनी जोरदार आरोप केले होते. भडगाव येथेच भाजपच्या कार्यकर्ते आणि ठरावधारक यांच्या बैठकीत बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत आपण ५ जागा मागणार आहोत. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यास माझा विरोध नाही पण पक्षीय राजकारण सोडून काही घडत असल्यास जिल्हयातील इतर नेतेही आम्हाला लांबचे नाहीत असे बक्तव्य केले होते.

यावर जोराची राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यानंतर पुन्हा आज भडगाव येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार पाटील यांनी गोकुळच्या राजकारणात कायम आपल्यावर अन्याय झाला असुनमहायुतीच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असल्याचे सांगत असतानाच दोन दिवसांत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी गोकुळच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले.

या चर्चेत मानसन्मान राखला तर ठिक अन्यथा आमचा आम्ही योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली आहे. मंत्री मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबर गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर आरोप करणाऱ्या आमदार पाटील यांनी पुन्हा महायुती म्हणून मंत्री मुश्रीफ यांच्याशी बोलण्याची तयारी दाखवल्याने गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ‘ब्टीस्ट’ तयार झाला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​