Uncategorized

  पुण्यात हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

 

पुणे -पुणे जिल्ह्यात लोणीकंवजबळ तुळापूर रस्त्यावरील एका फार्महाऊसबर आयोजीत करण्यात आलेल्या एका खासगी रेव्ह पार्टीबर पोलिसांनी रबिबारी पहाटे छापा टाकला. या पार्टीमध्ये परबानगीच्या बेळेचे उल्लंघन करून मोठ्या आबाजात डीजे बाजवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पुणे पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही तपासात समोर आले आहे. यात १५६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये १०७ पुरुष आणि ४९ तरुणींचा समावेश होता. घटनास्थळावरून अंदाजे ३ ग्रॅम गांजा, १० प्रतिबंधित हुक्का फ्लेबर्स आणि अंदाजे ९,२२,००० किमतीचा वारु साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत एकूण ८५ लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

खासगी बंगल्यात ६ ते ७ जून दरम्यान ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’ नावाने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आयमान शेख (ब्लेझ एंटरटेनमेंट) आणि यश चौधरी (स्टार लाईट एंटरटेनमेंट) हे या रेव्ह पार्टीचे मुख्य आयोजक आहेत. त्यामुळे त्या दोघांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या रेव्ह पार्टीत १०७ पुरुष आणि ४९ तरुणींचा समावेश
लोणीकंद पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने पुण्यातील आळंदी-मरकळ रोडवरील एका बंगल्यात सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या एका हाय-प्रोफाईल पार्टीवर छापा टाकला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात सुरू होती. पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर १५ अधिकारी आणि ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी पहाटे २.३० वाजता बंगल्यावर छापा टाकला आणि १५६ जणांना ताब्यात घेतले. ज्यामध्ये १०७पुरुष आणि ४९ तरुणींचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे यापैकी तीनजण २१ वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. कार्यक्रमासाठी दिलेला दारू विक्रीचा परवाना फक्त शनिवारी (६ जून) रात्री ११.३० पर्यंतच वैध होता. मात्र त्यानंतरही पार्टी सुरू होती.

घटनास्थळावरून अंदाजे ३ ग्रॅम
गांजा, तीन कप पॉटमध्ये ठेवलेले १० प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स आणि अंदाजे ९,२२,००० किमतीचा दारु साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत एकूण ८५ लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून अमली पदार्थाच्या वापराशी संबंधित काही साहित्य तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​