Uncategorized

Actress Sushma Murudkar”नीट हिंदी बोल गावठी मराठी चालणार नाही” ‘कमळी’ मालिकेतील रागिणीचा असा झाला होता अपमान

मराठी कलाकर आशयघन चित्रपट आणि उत्तम अभिनयासाठी देशभरात कौतुकास पात्र होतात. कितीतरी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू या कलाकारांनी तर हिंदीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता.

मराठी नाटक आणि चित्रपटांना वेगळ्या धाटणीचे आणि आशयाचे म्हणून देशभरात ओळखले जाते. पण काही वेळा मात्र हिंदीतल्या काही दिग्दर्शकांकडून मराठी कलाकारांना अपमानाची वागणूक मिळते. असाच एक प्रसंग झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ मालिकेत रागिणी महाजन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीसोबत घडला होता. राजश्री मराठीला  दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा अभिनेत्रीने सांगितला.

दिग्दर्शकाने केलेला अपमान

अभिनेत्री सुषमा मुरुडकर हिने कुंडली भाग्य या हिंदी मालिकेदरम्यान दिग्दर्शकाने कसा उच्चारावरुन अपमान केला याची आठवण सांगितली. मुलाखतीदरम्यान सुषमा म्हणाली, आम्ही मालिकेचं शूट करत होतो. माझे हिंदी उच्चार नीट येत नव्हते. अचानक मराठी हिंदी मिक्स झालं, आणि खूप दूरवर बसलेला दिग्दर्शक तिला म्हणाला “तुझं गावठी मराठी नकोय, नीट हिंदी बोल” यावेळी सेटवर जवळपास २०० लोक उपस्थित होते पण हा अपमान होऊनही  मी ओके सर इतकंच म्हणाले.

निर्मात्याचा पाठिंबा

सुषमा मुलाखतीत पुढे बोलताना म्हणाली “त्यानंतर अनेक हिंदी मालिका केल्यानंतर मी माझं हिंदी सुधारु शकले, त्यानंतर जेव्हा मी मराठी मालिकेत आले तेव्हा एकाने सांगितले की तू मुक्याचा रोल चांगला करु शकशील कारण तुझं मराठी नीट नाही पण त्या मालिकेचा निर्माता चांगला होता तो म्हणाला तू तोंडात पेन्सिल पकडून प्रॅक्टिस कर. आणि माझं मराठी सुधारलं.                                   ” 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​