Uncategorized

पंढरपूर बसस्थानक परिसरात प्राणघातक हल्ला;

 

पंढरपूर -जुन्या भांडणाचा राग मनात धरून पंढरपूर बस स्टैंड परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शामराव रामा पवार (बय ३६, रा. शेवते, ता. पंढरपूर) हे बस स्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांना गाठले. आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला.

हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कोयता आणि सळईने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. आरोपींमध्ये अजय नवगिरे, सोमा देवकर, अमोल बंदपट्टे, अनिल कांबळे, लखन बंदपट्टे आणि इतर दोन अज्ञात इसमांचा समावेश आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोहेकॉ बाघमारे करत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​