Uncategorized

Cockroach Janata Party violent agitation in Delhi

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पाच दिवसांची मुदत : येत्या शनिवारी पुन्हा जंतर-मंतरवर धडक देण्याचा इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर पाच तासांचे आंदोलन केले. ‘शिक्षणमंत्र्यांनी पाच दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, नाहीतर आम्ही पुढच्या शनिवारी जंतर मंतरवर परत येऊ’ असा इशारा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे. ‘सीजेपी’च्या या पहिल्याच आंदोलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. ‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी विमानतळ, मुख्य रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि दिल्लीच्या सीमावर्ती भागांवर सुरक्षा वाढवण्यात आली होती. पूर्वनिश्चित ठिकाणी 1,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बाजारपेठा आणि संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देण्यात आले होते. ‘सीजेपी’चे आंदोलन सुमारे पाच तास चालले. दुपारी 3 वाजता अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक तेथून निघाले. यानंतर, आंदोलनस्थळ हळूहळू रिकामे होऊ लागले. सीजेपीला जंतर मंतरवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके सकाळीच अमेरिकेतून दिल्लीला परतले होते. ते विमानतळावरून थेट जंतर-मंतरला गेले. अभिजीत दीपके आंदोलनस्थळी डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र आणि संविधानाची एक प्रत घेऊन आले होते.

सोनम वांगचुक आंदोलनात सामील

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात सामील झाले. त्यांच्यासोबत ‘सीजेपी’चे प्रवक्ते आशुतोष रांका हेही उपस्थित होते. आशुतोष हे आयआयटी कानपूरचे पदवीधर असून गेल्या वर्षी लंडनहून भारतात परतले आहेत. गेल्यावर्षी लडाखमध्ये केलेल्या आंदोलनामुळे वांगचुक यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर आता ते प्रथमच पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी दिसून आले.

सहा जण ताब्यात

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. परिणामी, काही व्यक्तींना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले. सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असले तरी सायंकाळी सर्वांना सोडून देण्यात आले. राज्याच्या राजधानीत जवळपास पाच तास चाललेले हे आंदोलन शांततेत पार पडले.

 

घटनाक्रम….

सकाळी 7:45 : अभिजीत दीपके दिल्ली विमानतळावर दाखल

सकाळी 10:30 : अभिजीत दीपके जंतर-मंतरवर पोहोचले

दुपारी 12:00 : अभिजीत दीपकेंनी मंचावर येत भाषण दिले

दुपारी 12:30 : हजारो आंदोलक सहभागी झाल्याचा ‘सीजेपी’चा दावा

दुपारी 3:00 : जंतर-मंतरवरील आंदोलन समाप्त, अभिजीतही रवाना.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​