Uncategorized

कौतुकास्पद! कोल्हापूरच्या ‘या’ ७ किमीच्या रस्त्यावर प्लास्टिकचा एक कणही शोधून सापडणार नाही; वाचा काय आहे कारण

राधानगरी – राधानगरीच्या अलीकडे मांजर खिंड ते काळम्मावाडी धरण हा रस्ता आहे . दुतर्फा दाट झाडी आणि सात किलोमीटर वळणावळणाचा ह रस्ता निसर्गाचे वैभव दाखवणारा आहे . या रस्त्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की या रस्त्यावर कोठे कागदाचा एक कपटा दिसत नाही .रिकाम्या प्लास्टिक बाटल्या,पिशव्या, रस्सा मंडळासाठी वापरलेल्या पत्रावळ्या,द्रोण,खरकटे याचा एक कण पाहायला मिळत नाही . अगदी या थंडगार आणि स्वच्छ ..स्वच्छ ..रस्त्यावर पाय पसरून झोपावे असे वाटण्यासारखा हा रस्ता आहे .

पण हा रस्ता इतका स्वच्छ कसा हा प्रश्न या रस्त्यावरून जाताना प्रत्येकाच्या मनात येणे अगदी साहजिक आहे .आणि या रस्त्याची स्वच्छता राखण्याचे या परिसरातील लोकांनी घेतलेले व्रत हेच हा रस्ता इतका स्वच्छ राहण्याचे कारण आहे .मनात आणले तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक काय करू शकतो आणि जगाला दोष देत,व्याख्याने देत बसण्याऐवजी स्वतःच रस्त्यावर उतरलो तर आपण आपल्या ताकदीने काय बदल घडू शकतो याचे हे आदर्श घेण्यासारखे उदाहरण आहे .

मांजर खिंड ते राधानगरी हा रस्ता दाट झाडीचा .किंबहुना जंगलातून या दाट झाडीतूनच काळम्मावाडी धरणाकडे जाण्यासाठी हा रस्ता काढला गेला . अलीकडे जरूर निसर्ग पर्यटनाकडे लोकांचा ओढा आहे . पण या निसर्ग पर्यटनाच्या निमित्ताने दाट झाडाच्या सावलीत बसून “खाण्याचा पिण्याचा “.कार्यक्रम करणे हा पर्यटनातील मुख्य आकर्षण आहे . त्यामुळे अशा दाट झाडी च्या रस्त्यावर हे असे कार्यक्रम सुरू असतात .पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गाणी लावली जातात .गाणी नुसती न ऐकता त्या गाण्याच्या तालावर ताल धरले जातात .आणि त्यालाच अनेक जण निसर्ग पर्यटन म्हणतात . असेच निसर्ग पर्यटन या मांजर खिंड ते काळम्मावाडी या रस्त्यावरचालू होते .
पण एवढा चांगला निसर्ग आणि त्याचा आनंद घेण्याची विकृत पद्धत पाहून या परिसरातील जबाबदार नागरिक अस्वस्थ होते .

सगळ्या जगातले पर्यावरण राहू दे .कारण ते आपल्याला शक्य नाही पण आपल्या परिसरातले,आपल्या आवाक्यातले हे मांजर खिंडीतले पर्यटन तरी आपण जपले पाहिजे ही त्यांची भावना होती .आणि ते बायोडायव्हर्सिटी ग्रुप या नावाने एकत्र आले आणि त्यांनी मांजर खिंड ते काळम्मावाडी या रस्त्याची पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलली . या ग्रुप मध्ये वेगवेगळ्या व्यापातले, वेगवेगळ्या उद्योगातले, वेगवेगळ्या नोकरीतले त्यामुळे त्यांनी जबाबदारी वाटून घेतली . सर्वांनीच रोज एकत्र आले पाहिजे असे नव्हे तर असे नाही पण रोज काहीजणांनी एकत्र येऊन हा रस्ता स्वच्छ ठेवायचा हे व्रत त्यानी हाती घेतले .

आज आठ ते दहा महिने झाले हे व्रत अगदी निष्ठेने जपले जात आहे .आणि हा रस्ता,हा परिसर अगदी स्वच्छ म्हणजे स्वच्छ आहे .एवढेच नव्हे तर जिथे जिथे थोड्या मोकळ्या जागा दिसतील तेथे तेथे त्यांनी औषधी वृक्षांचे रोपण केले आहे . एवढेच नव्हे तर या मार्गावरील देवराईत असलेल्या डोंगराई देवीच्या मंदिरात छोटी लायब्ररी लायब्ररीही चालू केली आहे . पर्यावरण आणि पर्यावरण रक्षण त्याला खूप मोठी शास्त्रीय किनार आहे .पण मांजर खिंडीत साध्या साध्या माणसांनी आपल्या निसर्ग प्रेमातून खूप काही वेगळे करून दाखवले आहे .


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​