Uncategorized

Solapur News : किरकोळ वादातून भावाचा खून 

                                                      निंबर्गी येथील घटना, आरोपीला पोलिसांनी केली अटक 
मंद्रूप ; निंबर्गी येथे कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा जात्याची दगडी पाळ डोक्यात घालून खून केला ही धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवणसिद्ध ऊर्फ महांतेश सूर्यकांत ऐवळे (वय ४०, रा. निंबर्गी) हे घरासमोर झोपलेले असताना त्यांचा धाकटा भाऊ संतोष सूर्यकांत ऐवळे याने जात्याची दगडी गोल पाळी महांतेश यांच्या कपाळावर व तोंडावर मारली.
या हल्ल्यात महांतेश ऐवळे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताची पत्नी दीपाली ऐवळे (वय २३, रा निंबर्गी) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दीराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री आईने बनविलेल्या भाजीवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले होते.
भाजी चांगली झाली नाही म्हणत मोठ्या भावाने ताट भिरकावले होते त्याचाच राग मनात धरून संतोष ऐवळे याने पहाटेच्या सुमारास आपल्या भावाचा खून केला. या प्रकरणी मंदूप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार म्हणजे जात्याची दगडी गोल पाळी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपी संतोष सूर्यकांत ऐवळे यास अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक काशीद यांनी केले आहे. या घटनेमुळे निंबर्गी गावात शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​