Uncategorized

“तू मागच्या जन्मी नागीण होतीस आणि हा नाग” सांगलीतल्या विट्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, बुवाबाजीचा आणखी एक बळी

श्रद्धा आणि विश्वास यातली रेषा पुसट झाली की माणूस त्याची सदसदविवेकबुद्धी हरवून बसतो आणि मग सुरु होतो वासनेचा आणि शोषणाचा खेळ. नाशिकच्या कथित अध्यात्मगुरु अशोक खरात प्रकरणाचे कांड ताजे असतानाच आता सांगलीतल्या विट्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका अल्पवयीन मुलीला तू गेल्या जन्मीची नागीण आहेस आणि हा नाग याजन्मी तुमचं लग्न व्हावं म्हणून तुमचा जन्म झाला आहे. असं सांगत वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराने विटा आणि सांगली परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी महेश मोहन बाबर, संकेत संदिप निकम आणि सुरज उपाध्ये या तीन भोंदूविरोधात पोक्सो, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कडेश्वर धाम संस्था

याबाबतची अधिक माहिती अशी, विट्यातील पाटील वस्ती  परिसरात गेल्या काही काळापासून ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ या नावाने एक आश्रम सुरु होता. वरवर पाहता हा इथे पूजा अर्चा, होमहवन, आणि दैवी उपाय यांचा आभास निर्माण केला जात होता. मात्र आत काहीतरी वेगळेच सुरु आहे अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात होती. महेश बाबर, संकेत निकम आणि सुरज उपाध्ये हे तीन आरोपी आमच्या अंगात दैवी शक्ती आहे असं सांगून लोकांची आर्थिक लूट करत होते.

याच काळात शारिरिकी व्याधींनी ग्रस्त असणारी अल्पवयीन मुलगी या तिघांच्या संपर्कात आली. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आरोपींनी तिला तू मागच्या जन्मीची नागीण आहेस अशी बतावणी करुन तिचे लैेगिक शोषण केले.

पिडीतेच्या पालकांचेही आर्थिक शोषण

या तीन नराधमांनी केवळ त्या मुलीचे लैंगिक शोषण केले नाही तर त्या पिडीत मुलीच्या पालकांकडून ४ लाख उकळल्याचे समोर आले आहे. .यापैकी साडेतीन लाख बँक खात्यात तर ५० हजार रुपये रोख उकळल्याचा उघडकीस आले आहे. अखेर मानसिक, शारिरीक छळ असह्य झाल्याने अल्पवयीन मुलीनेच धाडस दाखवत विटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या भोंदूंचा खरा चेहऱा समोर आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​