Uncategorized

सिंधू, लक्ष्य, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत, प्रणॉय पराभूत

वृत्तसंस्था/सिंगापूर

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 10 लाख अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकेमच्या सिंगापूर खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत गुरूवारी भारताच्या पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर भारताच्या एच. एस. प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले. पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी झगडावे लागले. तसेच मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठली.

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात भारताची माजी विश्वविजेती आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने जपानच्या रिको गुंजीचा केवळ 37 मिनिटांत 21-9, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कोरियाच्या टॉपसिडेड अॅन से यंगशी होणार आहे. कोरियाच्या यंगकडून सिंधूला गेल्या आठ लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला होता. गेल्यावर्षी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत यंगने सिंधूला हरविले होते.

पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात इंडोनेशियाच्या व्हिटीडसनने पाठ दुखापतीमुळे पहिल्या गेममधूनच माघार घेतल्याने भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली. 2021 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने कांस्यपदक मिळविले होते. आता लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या कोकी वाटांबेशी होणार आहे. मात्र भारताच्या एच. एस. प्रणॉयला दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. सिंगापूरच्या लोह केन येवने प्रणॉयचा 21-18, 16-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​