Gokul Election | गोकुळ निवडणुकीसाठी Satej Patil उतरले मैदानात; महायुतीच्या तगड्या आव्हानासमोर ठोकला शड्डू!

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांचे रणशिंग
कोल्हापूर -गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी स्थापन करून महायुतीच्या विरोधात निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ‘शेतकरी उत्पादकांचा गोकुळ टिकवा’, ही टॅगलाईन घेऊन मैदानात उतरत असल्याची घोषणा करून लढतीचे चित्र स्पष्ट केले. ठरावधारकांना उद्देशून ‘स्वाभिमानी सभासदांच्या पाठबळावरनिवडणुकीला सामोरे जात असल्याने साथ द्यावी’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गोकुळची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गतवेळच्या तुलनेत यावेळचीराजकीय समीकरणे बदलली आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, विनय कोरे हे गतवेळचे सर्व सहकारी महायुतीत गेल्याने आमदार सतेज पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. येईल त्यांना सोबत घेऊन समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी घोषणा पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. मंगळवारी याची औपचारीक घोषणा करताना राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीया नावाने स्वतंत्र पॅनेल निवडणुकीत असणार आहे. या घोषणेमुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गोकुळ दूध संघाची सत्ता आता एकविचाराने काम करणाऱ्या चांगल्या लोकांच्या हाती असणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी दूध संस्थेच्या माध्यमातून योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करणे, या ठरावधारकाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये भविष्यकाळात गोकुळ टिकला पाहिजे यादृष्टीने चांगली भूमिका घेणे महत्वाचे आहे. -आमदार सतेज पाटील
Source link



