Uncategorized
Chandrakant Patil News | खरीपात खत, बियाणे टंचाई होणार नाही

पाणीसाठा शेतीसाठी वापरण्यापेक्षा लोक आणि पशुधनासाठी राखण्याचे आवाहन
सांगली : खरीप हंगामात खत टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून कृषी विभागाने खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करावे, तसेच पावसाने ओढ दिल्यास सध्याचा पाणीसाठा शेतीसाठी वापरण्यापेक्षा लोक आणि पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केले.
जागतिक ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंधन वापराचा प्राधान्यक्रम ठरवू, टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे डिझेल मिळणे ही मोठी गरज आहे. त्यानुसार पुढील किमान ३-४ महिने कायम शेतकऱ्यांना डिझेल देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कृषी विभागाची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या इंधन गरजा पूर्ण होऊ शकतील यासाठी शहरी भागातील लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि स्वतःच्या खाजगी वाहनांसाठी इंधनाचा वापर कमी करण्याची गरज आहे. इंधनाप्रमाणेच गॅसच्या बाबतीतही हॉटेल व्यवसायापेक्षा घरगुती वापराच्या गॅसला प्राधान्य देणे गरजेचे आहे, जेणेकरून सामान्य कुटुंबांना तो पुरवून वापरता येईल. आता इंधन आणि ऊर्जा वापराबाबत गांभीर्याने करावा लागत आहे.
पंतप्रधान महोदयांनी केलेल्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. चालू असलेले युद्ध थांबल्यानंतरही, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जाईल.
अंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण-इस्रायल युद्धामुळे खतांची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात उपलब्ध खतांचा साठा नियंत्रित ठेवून व्यवस्थित वाटप करावे. जूनमध्ये पाऊस पडेल पण जुलै-ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे सध्याचा पाणीसाठा शेतीसाठी वापरण्यापेक्षा माणसे आणि जनावरांच्या पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावात हवामान किंवा पर्जन्य मापक बसवण्यासाठी जिल्ह्याने जागा निश्चित केली असली तरी, ते बसवण्याची गती वाढवणे आवश्यक आहे. विम्याच्या प्रक्रियेत या यंत्रांचे महत्त्व असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
Source link



