Uncategorized

अव्वल स्थान कायम ठेवण्याचे ‘आरसीबी’चे लक्ष्य

‘क्वालिफायर 1’साठी पात्र ठरू पाहणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी सामना, लढत चुरसपूर्ण होण्याची अपेक्षा असली तरी बेंगळूरचे पारडे जड

वृत्तसंस्था/हैदराबाद

गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आज शुक्रवारी हैदराबादमध्ये होणाऱ्या त्यांच्या आयपीएल 2026 मधील शेवटच्या साखळी सामन्यात आमनेसामने येणार असून गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांमध्ये स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. ‘आरसीबी’ सध्या 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे आणि 10 संघांमध्ये त्यांचा निव्वळ रन रेट 1.065 इतका सर्वोत्तम आहे. शुक्रवारी विजय मिळवल्यास त्यांचे पहिले स्थान निश्चित होईल आणि त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळतील. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद 13 सामन्यांतून 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचे गुण गुजरात टायटन्सच्या बरोबरीचे असले, तरी नेट रन रेटच्या बाबतीत ते मागे आहेत. गुजरातचा नेट रन रेट  0.400 आहे, तर हैदराबादचा 0.350 आहे. त्यामुळे अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची सर्वोत्तम संधी म्हणजे आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव करणे आणि चेन्नई सुपर किंग्स गुजरातला हरवतील अशी आशा करणे.

कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आक्रमक फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी यांचा सुरेख मेळ साधत सलग दुसऱ्या हंगामात त्यांनी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. विराट कोहली या त्यांच्या प्रमुख खेळाडूने फलंदाजीच्या आघाडीवर सातत्यपूर्ण कामगिरीची नवी व्याख्याच रचली आहे. त्याने 13 सामन्यांतून 542 धावा फटकावल्या आहेत. त्याच वेळी देवदत्त पडिक्कलसाठीही हा हंगाम चांगला ठरला आहे.

भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या जोडीनेही आरसीबीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भुवनेश्वरचा समावेश आहे. त्याने नव्या चेंडूने सातत्याने प्रभावी गोलंदाजी केली आहे, तर हेझलवुडने निर्णायक क्षणी अत्यंत परिणामकारक गोलंदाजीचे स्पेल टाकले आहेत. कृणाल पांड्यानेही आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले असून गोलंदाजीतील सूक्ष्म बदलांचा वापर करून त्याने फलंदाजांना अडचणीत आणले आहे. लेगस्पिनर सुयश शर्मा आणि अष्टपैलू रोमारियो शेफर्ड यांनीही आपापल्या परीने संघासाठी योगदान दिले आहे.

सातत्याचा अभाव असलेल्या हैदराबाद संघाविऊद्ध आरसीबी हेच विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सनरायझर्स हैदराबादने सलग पाच सामने जिंकून पुन्हा एकदा सूर गवसल्याचे संकेत दिले होते, मात्र त्यानंतरच्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेतील सर्वात विध्वंसक फलंदाजी फळींपैकी एक हैदराबादकडे आहे. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन आणि हेन्रिक क्लासेन हे ज्या दिवशी फॉर्मात असतील त्या दिवशी कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाची अक्षरश: दाणादाण उडवू शकतात.

तथापि, फलंदाजीतील सातत्याचा अभाव त्यांना निर्णायक क्षणी महागात पडला आहे.  फलंदाजीतील अपयश हेच त्यांच्या अलीकडील पराभवांचे मुख्य कारण ठरले आहे. सकारात्मक बाजू पाहता हैदराबाद संघाला कर्णधार पॅट कमिन्सचे नेतृत्व आणि काही रोमांचक युवा वेगवान गोलंदाजांच्या उदयामुळे मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज ईशान मलिंगा हा या हंगामातील एक अत्यंत प्रभावी आणि लक्षवेधी खेळाडू ठरला आहे. दबावाच्या परिस्थितीतही त्याने सातत्याने संघाला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिले आहेत आणि फारशा धावाही दिलेल्या नाहीत. दुखापतीतून सावरल्यानंतर स्पर्धेच्या मध्यावर संघात परतलेल्या कमिन्सने स्वत: गोलंदाजी विभागात अधिक तीव्रता आणि अचूक नियंत्रण आणले आहे.

संघ

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेन्रिक क्लासेन, सलिल अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रे•ाr, शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल्ल हिंगे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​