शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आर.के. कामत यांची निवड

याव्यतिरिक्त त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रभारी कुलगुरू म्हणूनही उत्कृष्ट प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर (विशेषत: स्प्रिंगर, यूके सारख्या नामांकित प्रकाशकांद्वारे) अनेक पुस्तके लिहिली आहेत.आर. के कामत यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (DST) ‘यंग सायंटिस्ट फेलोशिप’ देखील प्राप्त झाली आहे. त्यांचे मुख्य संशोधन कार्य स्मार्ट सेन्सर्स, एम्बेडेड सिस्टीम्स आणि VLSI डिझाईन या विषयांवर केंद्रित आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुपद गेल्या 9 महिन्यांपासून रिक्त होतं त्यामुळे या पदावर कोण बसणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.यापुर्वीचे कुलगुरु डी.टी शिर्के यांचा कार्यकाल 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला होता. त्यानंतर कुलगुरुपद रिक्तच होते. या काळात शिवाजी विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
Source link



