एलईटीच्या दहशतवाद्याने भारतात करविले हेयर ट्रान्सप्लांट

केस गळतीने आत्मविश्वास खालावल्याची एनआयएसमोर कबुली : पाकिस्तानचा नागरिक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यावरून मोठा खुलासा झाला आहे. लष्कर-ए-तोयबाशी (एलईटी) संबंधित दहशतवाद्याने एनआयए चौकशीत काश्मीर खोऱ्यातील जीवन दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये शिकविण्यात आल्याप्रमाणे अजिबात नव्हते अशी कबुली दिली आहे. श्रीनगरमध्ये केस पुन्हा उगविण्याचा उपचारही (हेअर रेस्टोरेशन ट्रीटमेंट) करविली, कारण अनेक वर्षांपासून केस गळतीच्या समस्येला तोंड देत होतो असे दहशतवाद्याने सांगितले आहे.
या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद उस्मान जट्ट उर्फ ‘चायनीज’ आहे. जट्टने चौकशीदरम्यान खोऱ्यातील उत्तर हिस्स्यामधून जम्मू-काश्मीरमधील स्वत:ची घुसखोरी आणि वास्तव्य केलेल्या स्थानांविषयी माहिती दिली आहे. पाकिस्तानात स्थित एलईटी म्होरक्यांनी दिलेल्या निर्देशानुसार साखळी हल्ले घडवून आणण्यासाठी सीमा ओलांडली होती असे जट्टने सांगितले आहे.
चायनीज नावाने ओळख
जट्ट हा उत्तर आणि मध्य काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. एलईटीच्या सीमापार प्रशिक्षणात जे सांगण्यात आले होते, त्याच्या उलट काश्मीरमध्ये सर्वसामान्य जीवनाची वास्तविका पाहून माझा उद्देश पूर्णपणे बदलल्याचे त्याचे सांगणे आहे. दहशतवादी नेटवर्कमध्ये स्वत:चे टोपणनाव चायनीजने ओळखल्या जाणाऱ्या जट्टला मागील महिन्याच्या प्रारंभी श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यासोबत अब्दुल्ला उर्फ अबु हुरैरालाही पकडण्यात आले होते, जो एलईटीचा सर्वात जुना दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते.
स्लीपर मॉड्यूल तयार करण्याची जबाबदारी
जट्ट आणि अब्दुल्लाला एलईटीकडून जम्मू-काश्मीरबाहेर ‘स्लीपर मॉड्यूल’ निर्माण करण्याचे काम सोपविण्यात आले होते. यातील जट्ट हा अनेक वर्षांपासून गंभीर स्वरुपात केसळ गळण्याच्या समस्येला तोंड देत होता, यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला मोठी ठेच पोहोचली होती.
पूर्ण नेटवर्कचा भांडाफोड
श्रीनगरच्या पर्वतीय भागांमध्ये जट्टला पाकिस्तानी दहशतवादी जरगम आणि अब्दुल्ला उर्फ अबू हूरैरा यांची गाठ घालून देण्यात आली आहे. जट्टने चौकशीत नावं उघड केल्यावर पोलिसांनी उत्तर काश्मीर आणि श्रीनगर शहरात सक्रीय दहशतवादी संघटनेच्या ‘ओव्हर ग्राउंड वर्कर्स’च्या नेटवर्कचा भांडाफोड केला आहे.
हेअर रेस्टोरेशन ट्रीटमेंट
जरगमने जट्टला एका दुकानावर नेले होते, या दुकानाच्या मालकाने हेयर रेस्टोरेशन ट्रीटमेंट करविल्याचे कळताच जट्ट त्याला वारंवार भेटण्यासाठी जाऊ लागला. तसेच हेअर रेस्टोरेशन ट्रीटमेंट करविण्यास मदत करण्याची विनवणी करू लागला. अखेर शहरातच या प्रक्रियेसाठी जट्टला नेण्यात आले आणि अनेकदा याकरता त्याला रात्रभर क्लीनिकमध्ये रहावे लागले होते.
Source link



