देवसूत 17 मे रोजी “शिव महोत्सव सोहळा”

ओटवणे प्रतिनिधी
देवसु पलिकडचीवाडी येथील श्री देवी शेंडोबा माऊली युवा कला क्रिडा मंडळाच्यावतीने रविवार १७ मे रोजी ‘जागर शिव विचारांचा…, प्रयत्न आपुल्या एकीचा…’ या विचाराने प्रेरित होऊन शिव महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ८ वाजता गणेश पुजन, त्यानंतर शिवपुजन व दिप प्रज्वलन करून महाराजांना सामुहीक मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता पालखीसह भव्य मिरवणुक निघणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार आहे.रात्री ९.३० वाजता श्री. वडची देवी प्रासादिक भजन मंडळ (लिंगडाळ – देवगड) चे प्रसिद्ध बुवा संदीप लोके आणि श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ (वर्दे -कुडाळ) चे प्रसिद्ध बुवा विजय (गुंड) सावंत यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच या शिव महोत्सव सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी ९६८९०९८९४७ आणि ८६५२०३९२९९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन श्री देवी शेंडोबा माऊली युवा कला क्रिडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
Source link



