Vasai Murder Case हत्या केली, मृतदेह ड्रममध्ये घालून नाल्यात फेकला, नर्ससह भावाला अटक

पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका २४ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रममध्ये कोंबून नाल्यात फेकल्याच्या घटनेला महिना उलटल्यानंतर, ठाणे पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणाचा छडा लावला असून, या प्रकरणी एका नर्स आणि तिच्या भावाला अटक केली आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार अरबाज खानची हत्या ही खंडणी न दिल्यामुळे झाली असे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. “येथील डोंबिवलीतील एका खासगी कंपनीत कामाला असलेला खान, पगाराचे पैसे आणण्यासाठी मुंबईतील दादरला जात असताना ३ एप्रिल रोजी बेपत्ता झाला आणि त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू झाला. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर तपास मेहजबीन शेखपर्यंत पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार मृत अरबाजचे मेहजबीनसोबत प्रेमसंबंध होते,”
त्याच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक माहितीनुसार खानचे शेवटचे लोकेशन वसई असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच सुमारास मेहजबीनही त्याच परिसरात होती, असे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या विरार फाटा येथे ५ एप्रिल रोजी खान यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
मेहजबीनला पैसे परत हवे होते..
मिळालेल्या माहितीनुसार “मेहजाबीनने मृत अरबाजला काही पैसे उसने दिले होते आणि तिला ते परत हवे होते. त्याच्याकडून पैसे परत मिळवण्याच्या उद्देशाने, मेहजबीन आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला वसईतील एका निर्जन ठिकाणी बोलावले. त्याचे हातपाय बांधण्यात आले आणि पीव्हीसी पाईपने मारहाण करून त्याला ठार मारण्यात आले,”
मृतदेह ड्रममध्ये घातला
अरबाज याची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींनी खानचा मृतदेह एका ड्रममध्ये कोंबला आणि तो ड्रम तेथील नाल्यात फेकून दिला, .मेहजबीन आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना ७ मे रोजी अटक करण्यात आली, तर तिचा पती हसन आणि मुजज्जम तालिब खान नावाचा त्याचा साथीदार फरार आहेत, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.
Source link



