Uncategorized

‘नीट-युजी-2026 परीक्षा रद्द

प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आल्याने निर्णय : नव्या परीक्षाचे वेळापत्रक काही काळानंतर घोषित करण्यात येणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट युजी-2026’ ही 3 मे या दिवशी झालेली देशव्यापी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेआधी फुटल्याचे उघड झाल्याने परीक्षा प्राधिकरणाकडून ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती पुन्हा द्यावी लागणार आहे. नव्या परीक्षाचे वेळापत्रक काही काळानंतर घोषित करण्यात येणार आहे.

या प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही परीक्षा 3 मे ला देशभरातील आणि परदेशांमधील विविध केंद्रांमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला 22 लाख 79 हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. आता या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अग्निदिव्य पुन्हा एकदा पार करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांची हानी होऊ नये, म्हणून परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्टीकरण परीक्षा प्राधिकरणाने मंगळवारी हा निर्णय घोषित केल्यानंतर केले आहे.

परीक्षेनंतर कारस्थान उघड

या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच काही दिवस फुटली होती आणि फुटलेली प्रश्नपत्रिका अनेक परीक्षार्थींपर्यंत पोहचली होती, असे परीक्षेनंतर परीक्षा प्राधिकरणाच्या आणि केंद्रीय अन्वेषण संस्थांच्या संशोधनातून उघड झाले. त्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेसंबंधी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेमकी किती परीक्षार्थींना ही प्रश्नपत्रिका आधी प्राप्त झाली आहे, हे अनिश्चित आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची हानी होऊ नये, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. परिणामी परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे.

कारस्थान कसे लक्षात आले…

कोणत्याही स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेआधी विविध प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडून बऱ्याच ‘सराव प्रश्नपत्रिका’ सोडवून घेतात. या सराव प्रश्नपत्रिकांचे स्वरुप परीक्षेत येणाऱ्या प्रश्नपत्रिकेसारखे असते पण प्रश्न भिन्न असतात. यावर्षीच्या नीट परीक्षेच्या काही आठवडे आधी अशीच

एक ‘सराव प्रश्नपत्रिका’ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती. या सराव परीक्षेला ‘संभाव्य प्रश्नपत्रिका’ किंवा ‘गेस क्वेश्चन पेपर’ असे संबोधण्यात आले होते. ही ‘संभाव्य प्रश्नपत्रिका’ अनेक विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केली होती. या प्रश्नपत्रिकेत 410 संभाव्य प्रश्न होते. याच प्रश्नांपैकी 120 प्रश्न 3 मे या दिवशी झालेल्या परीक्षेत विचारण्यात आले होते, असे अन्वेषणातून नंतर उघड झाले.

सीबीआयकडे अन्वेषण सुपूर्द

ही संभाव्य प्रश्नपत्रिका अनेक व्हॉटस्अॅप गटांमधून वारंवार फॉरवर्ड केली गेल्याचेही अन्वेषणात उघड झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय प्रवेश परीक्षा प्राधिकरणाला (एटीए) संशय आला. नंतर हे संपूर्ण प्रकरण संशोधन करण्यासाठी सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे. सीबीआयने त्वरेने हे संशोधन हाती घेतले असून लवकरच या कारस्थानाच्या मुळापर्यंत पोहचून या घोटाळ्याचे सूत्रधार शोधले जातील, असे स्पष्ट केले. जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावयास लावणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अडचणीचे आहे, याची जाणीव प्राधिकरणाला आहे. तथापि, प्राप्त परिस्थितीत ही परीक्षा पुन्हा घेणे हेच तुलनात्मकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचे आहे, अशा निष्कर्षापर्यंत प्राधिकरण पोहचले आहे, असे स्पष्ट केले गेले.

राजस्थानात प्रथम उघडकीस

हे प्रश्नपत्रिकाफुटीचे कारस्थान प्रथम राजस्थान राज्याच्या सिकर जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर प्रथम 7 मे या दिवशी उघडकीस आले. या केंद्रांवरील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेआधी 48 तास साधारणत: 400 प्रश्नांची एक संभाव्य प्रश्नपत्रिका व्हॉटस्अप गटावरुन वितरीत करण्यात आली होती, असे स्पष्ट झाले.

पुढे काय केले जाईल…

ड नीट परीक्षेचे नवे वेळापत्रक काही दिवसांनंतर प्रसिद्ध करण्यात येत आहे

ड विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. प्रवेशकार्ड नवे दिले जाईल.

ड सध्या ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्याकडून नवे शुल्क नाही.

ड सध्या नोंदणी झालेले सर्व विद्यार्थी पुन्हा परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत.

ड विद्यार्थी-पालकांनी यासंदर्भात केवळ अधिकृत वृत्तांवरच विश्वास ठेवावा.

ड सोशल मीडियावर प्रसारित केली जाणारी अधिकृत माहिती दुर्लक्षित करावी.

ड विद्यार्थ्यांना नवे वेळापत्रक आणि नवे प्रवेशपत्र नव्याने पुरविण्यात येईल.

ड राष्ट्रीय प्रवेश परीक्षा प्राधिकरणाची विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी वेबसाईट आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​