युद्धाचे सावट, महागाईची भिती त्यात कर्ज महागले…कॅनरा बँकेच्या व्याजदरात वाढ

Canara Bank Intrest rate | जगात एकीकडे युद्धाचे सावट आणि महागाईची भिती असताना आता बँकांच्या वाढत्या व्याजदराने सामान्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅनरा बँकेने सर्व कर्ज कालावधींसाठी आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) मध्ये सुधारणा केली आहे.
बँकेने सर्व कालावधींसाठी आपले MCLR दर ५ बेसिस पॉइंट्सने (०.०५ टक्के) वाढवले आहेत. ही माहिती बँकेने BSE फाइलिंगमध्ये दिली आहे. नवीन MCLR दर १२ मे २०२६ पासून लागू झाले आहेत. या बदलाचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि फ्लोटिंग व्याजदर असलेल्या इतर कर्जांच्या EMI वर होऊ शकतो.
टाईम्स नाऊने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कॅनरा बँकओव्हरनाइट एमसीएलआर ७.८५% वरून ७.९०% पर्यंत वाढवण्यात आला आहे, तर १-महिन्याचा एमसीएलआर पूर्वीच्या ७.९०% वरून आता ७.९५% झाला आहे. १-वर्षाच्या एमसीएलआरवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे, कारण गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांसारखी अनेक रिटेल कर्जे त्याच्याशी जोडलेली आहेत. १-वर्षाचा एमसीएलआर आता ८.७०% वरून ८.७५% पर्यंत वाढला आहे. याचा भविष्यात काही ग्राहकांच्या ईएमआयवर परिणाम होऊ शकतो.
Source link



