सुनिल तटकरे- शरद पवार भेट…राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण

Sunil Tatkare meet Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक घडामोडींनी देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण करत महाराष्ट्राला धक्का दिला होता. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे नेते म्हणून सुनिल तटकरे यांना ओळखलं जातं. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार सुनिल तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकत्याच सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील घडामोडी, सुनील तटकरे यांचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नसल्याच्या बातम्यानंतर ही भेट होत असल्याने त्याला महत्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली ही पहिलीच भेट असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे आता येणाऱ्या काळात कळेलच पण सध्यातरी या भेटीच्या चर्चा गुलदस्त्यातच आहेत.
Source link



