Uncategorized

तामिळनाडूत विजय थलपती यांचाही आजच शपथविधी

बहुमताचा आकडा गाठण्यात ‘टीव्हीके’ला यश : काँग्रेसनंतर आता आणखी तीन छोट्या पक्षांचा पाठिंबा

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूच्या राजकारणात सरकार स्थापनेसंदर्भात सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये थलपथी विजय यांना मोठे राजकीय पाठबळ मिळाले आहे. डाव्या पक्षांनी म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), माकप आणि व्हीसीके यांनी विजय यांच्या ‘टीव्हीके’ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या विजय यांच्या ‘टीव्हीके’ने आता बहुमताचा आकडा गाठला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला यश आल्यामुळे छोटे पक्ष ‘टीव्हीके’च्या मदतीला धावून आले आहेत.

टीव्हीकेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर विजय थलपती यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना सादर केले. बहुमताचा आकडा गाठल्याने राज्यपालांनी त्यांना शपथविधीची अनुमती दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी 11 वाजता शपथविधीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. थलपथी विजय आता चार राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार आहेत. त्यांच्या तमिळिगा वेटी कळघम (टीव्हीके) या पक्षाला आता अनेक पक्षांकडून उघड पाठिंबा मिळाला आहे.

टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय सीपीआयच्या कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तामिळनाडूच्या बाबतीत 118 च्या बहुमताच्या आकड्याबाबत बोलायचे झाल्यास विजय यांच्याकडे 108 जागा आहेत. तथापि, विजय यांनी दोन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या पाठिंब्याने त्यांनी काँग्रेसच्या पाच जागा मिळवल्यामुळे त्यांच्या एकूण जागांची संख्या 113 झाली आहे. आता, भाकपचे दोन आमदार, माकपचे दोन आमदार आणि व्हीसीकेचे दोन आमदार विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत आहेत. या चार पक्षांच्या पाठिंब्याने विजय यांनी केवळ बहुमताचा जादुई आकडाच गाठला नाही, तर अधिक एक जागा मिळवली आहे.

‘विजयी’ घोडदौड…

  • टीव्हीके : 108
  • काँग्रेस : 5
  • भाकप : 2
  • माकप : 2
  • व्हीसीके : 2
  • एकूण : 119

Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​