Uncategorized

देगावमध्ये इसमाचा दगडाने ठेचून खून

घरात झोपण्यावरून वाद : संशयिताला अटक

बेळगाव : देगाव, ता. कित्तूर येथील एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. महांतेश निंगाप्पा हुच्चनावर (वय 52) राहणार देगाव, ता. कित्तूर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याच गावातील प्रकाश कल्लाप्पा काळार (वय 30) याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून खुनाच्या घटनेनंतर केवळ काही तासातच कित्तूर पोलिसांनी प्रकाशला अटक केली आहे.

घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुखांसह बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 6 मे च्या मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास देगाव बसस्टँडजवळील घरात ही घटना घडली आहे. खून झालेला महांतेश हुच्चनावर हा आरोपी प्रकाश काळार याच्या घरात झोपला होता. मध्यरात्री हा प्रकार उघडकीस येताच प्रकाशने महांतेशला जाब विचारला. तू इथे का झोपला आहेस? अशी विचारणा केली.

याच मुद्द्यावरून दोघा जणांमध्ये वादावादी झाली. भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकोपाला जाऊन प्रकाशने महांतेशला घराच्या दरवाजाजवळ पाडवून त्याच्या डोक्यावर दगड घातले. खुनानंतर महांतेशचा मृतदेह फरफटत आणून रस्त्यावर आणून टाकला. अत्यंत क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली आहे. खुनानंतर विनाविलंब संशयिताला अटक करून कित्तूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. महांतेशच्या खुनासाठी वापरण्यात आलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​