दिव्य ज्योती इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल 96.77%

त. भा. प्रतिनिधी
बांदा
दिव्य ज्योती इंग्लिश स्कूल, बांदा प्रशालेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत 96.77% निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे.यामध्ये स्वरा सातार्डेकर हिने 94.20% गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान पटकावला.समृद्धी परब हिने 93.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ख़ुशी शेख 92.40% गुण मिळवत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.यावर्षी प्रशालेतून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 31 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, पैकी 19 विद्यार्थी विशेष प्रविण्य श्रेणित,8 विद्यार्थी प्रथम श्रेणित तर 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, व्यवस्थापक फादर लिजो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Source link



