Uncategorized

अमननगर येथील विकासकामांची आमदार सेठ यांच्याकडून पाहणी

बेळगाव : अमननगर येथील चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा क्रॉस येथे गटारी, पथदीप आणि रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ सेठ यांनी महापालिका, हेस्कॉम व ठेकेदारांच्या उपस्थितीत कामांची पाहणी केली. सदर दौऱ्यावेळी आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. रहिवाशांनी विशेषत: पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान गटार, रस्ते व पथदीपांची समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. परिसरात मूलभूत आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. तातडीने सर्व समस्या मार्गी लावू, असे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले.

ठेकेदारांना सूचना

विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच दर्जेदार करण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी ठेकेदारांना केली. आमदारांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन समस्या जाणून घेतल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविल्या जातील व परिसराचा विकास केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​