Uncategorized

७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर ‘नो फ्लाय झोन’! रनवेवर नक्की काय घडणार?

                                          मुंबईत ६ तास विमान उड्डाण बंद;

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि ‘स्वप्नांची नगरी’ म्हणून ओळखली जाते. इथे दररोज लाखो प्रवासी विविध मार्गांनी प्रवास करतात. यामध्ये हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक मानले जाते. दररोज शेकडो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथून होतात.

दरम्यान, या विमानतळासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 7 मे रोजी हे विमानतळ काही तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल सहा तास विमानतळावरील दोन्ही रनवे बंद असतील. या कालावधीत कोणत्याही विमानाला उड्डाण करण्यास किंवा उतरण्यास परवानगी दिली जाणार नाही. परिणामी, या वेळेत नियोजित असलेल्या अनेक उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या बंदीमागे सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विमानतळावरील रनवेची तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल (मेंटेनन्स) कामे केली जाणार आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रनवे सुरक्षित आणि कार्यक्षम राहावेत यासाठी ही कामे अत्यावश्यक मानली जातात. त्यामुळेच प्रशासनाने नियोजित वेळेत पूर्णपणे विमानसेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या काळात विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करावे लागणार असून काही फ्लाइट्स पुढे ढकलल्या जाण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून किंवा अधिकृत संकेतस्थळावरून आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.एकूणच, काही तासांसाठी विमानसेवा बंद राहणार असली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​