Uncategorized

निरवडेत अद्ययावत व्यायामशाळेसाठी ८० लाखांचा निधी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची ग्वाही

​न्हावेली /वार्ताहर
निरवडे गावातील तरुणांच्या आरोग्यासाठी आणि व्यायामासाठी ८० लाख रुपये खर्चाची अद्ययावत व्यायामशाळा उभारली जाईल. ग्रामपंचायतीने यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून दिल्यास, शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल. मी जो शब्द देतो तो पूर्णच करतो,” अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. निरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्मित ‘माता प्रतीक्षागृह’, ‘खुली व्यायामशाळा’ आणि ‘पंचायत प्रशिक्षण केंद्रा’चा लोकार्पण सोहळा संजू परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, परीक्षित मांजरेकर, राजन रेडकर, माजी सरपंच सदा गावडे, संतोष गावडे, महेंद्र गावडे, नारायण गावडे, पोलीस पाटील अजित वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, मी जिल्हाप्रमुख पदाची धुरा हाती घेतल्यापासून पाहत आहे की, सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर हे विकासाचा आराखडा घेऊन सतत धडपडत असतात. निधी कसा खेचून आणावा हे निरवडे ग्रामपंचायतीकडून शिकावे. निरवडे गाव आज विकासकामांत अग्रेसर आहे. गावात कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे प्रलंबित राहत असलेल्या कामांची दखल घेत, त्यांनी सभापती सुस्मिता जाधव यांना तात्काळ ग्रामसेवक नियुक्तीचे निर्देश दिले.यावेळी सभापती सुस्मिता जाधव यांनी निरवडे ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचे कौतुक केले. महिलांसाठी माता प्रतीक्षागृह उभारणे हे अत्यंत कौतुकास्पद पाऊल असून स्वच्छता अभियानातही या गावाने उल्लेखनीय काम केले आहे. हा गाव माझ्या मतदारसंघात येत असल्याने येथील प्रश्नांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी नमूद केले.
सरपंच सुहानी गावडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शिवसेनेच्या माध्यमातून आणि संजू परब यांच्या पाठबळामुळे गावात सातत्याने विकासाची कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकासासाठी सर्वतोपरी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.​या कार्यक्रमात संजू परब आणि सुस्मिता जाधव यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गावात आयोजित महिला क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली, तर सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. या सोहळ्याला निरवडे गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​