Uncategorized

Pune news | शिरूरमध्ये माणुसकीचे दर्शन! रुग्णालयाच्या उंबरठ्यावरच महिलेची प्रसूती; डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई-बाळ सुरक्षित

                   शिरूरच्या जोशीवाडीत भररस्त्यातच गुंजला चिमुकल्याचा रडण्याचा आवाज

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर भागातमाणुसकी आणि कर्तव्याची अनोखी सांगड घालणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या तीव्र कळांनी त्रस्त झालेल्या एका गरोदर महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने भररस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला.

ही घटना शिरूरमधील जोशीवाडी परिसरात घडली. सकाळच्या सुमारास एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तत्काळ शिरूर
ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयाच्या अगदी जवळ येताच तिच्या वेदना असह्य झाल्या. चालणेही कठीण झाले आणि ती भररस्त्यातच बसून राहिली.

तिची अवस्था पाहून आसपासच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तणावपूर्ण स्थितीत धाडसी निर्णय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काही स्थानिकांनी तातडीने डॉ. सुनीता पोटे यांना संपर्क साधला. माहिती मिळताच डॉ. पोटे यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेची प्रकृती पाहून तिला तातडीने रुग्णालयात हलवणे शक्य नसल्याचे ओळखले. त्या क्षणी कोणताही निर्णय उशिरा घेतला असता, तर आई किंवा बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​