Uncategorized

माजी मुख्य नगररचनाकार एडगर रिबेलो यांचे निधन

त.भा. प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे माजी मुख्य नगरनचनाकार एडगर रिबेलो यांचे काल, शनिवारी निधन झाले. ते शहर नियोजन क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेले तज्ञ म्हणून परिचित होते. सध्या राज्यात वापरण्यात येत असलेल्या प्रादेशिक आराखड्याचे जनक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. प्रादेशिक आराखडा तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली होती. शहरी विकास, नियोजन आणि दीर्घकालीन धोरणनिर्मिती यामध्ये रिबेलो यांनी मोठे योगदान दिले आहे.

अनेक दशके त्यांनी देशभरातील विविध विकास प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका वठवली होती. त्यांच्या दु:खद निधनाने अनुभवी व अभ्यासू नगर रचनाकार रिबेलो यांना  गमवावे लागले. त्यांनी वयाची 90 वर्षे पार करूनही मार्गदर्शक म्हणून खूप मोठे योगदान दिल्याने त्यांच्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दु:ख व्यक्त केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​