Uncategorized

Hybrid Jowar | हायब्रीड ज्वारीला सोन्याचा भाव! बदलत्या जीवनशैलीमुळे गव्हापेक्षा भाकरीलाच पसंती

                   आरोग्याबाबतच्या जागरूकतेमुळे ज्वारीच्या दरात मोठी वाढ

चोरे– अलिकडच्या काळात बदलेल्या जीवनशैलीमुळे, वाढती बैठी कामे, कमी हालचाल यामुळे वेगवेगळ्या आजरांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोळी चपाती पेक्षा भाकरी खाण्याकडे लोकांचा कल दिसत आहे परिणामी कमी उत्पादन वाढलेली मागणी यामुळे हायब्रीड ज्वारीला सोन्याचा भाव आला आहे.

पूर्वी हलक्या मध्यम शेतात कमी पाऊस होणाऱ्या डोंगरी व माळरांनामध्ये हायब्रीड ज्वारी मोठ्या प्रमाणात केली जायची. तारळे, मसूर, कोळे, चोरे, चाफळया भागात पूर्वी चांगले हायब्रीड ज्वारी उत्पादन व्हायचे. सध्याच्या बदललेल्या कामाच्या पद्धती, राहणीमान, खानपान यामुळे लोकांमध्ये स्थूलतेचे प्रणाम वाढले आहे. रासायनिक खतामुळे, सकस आहाराचा अभाव यामुळे शुगर, रक्तदाब, थॉयराइड, बद्धकोष्ठता असे आजार वाढले आहेत. यावर उपाय म्हणून वैद्यकीय अधिकारी गव्हाची पोळी चपाती कमी करून आहारात भाकरीचा खाण्याचा सल्ला देतात.

आत्ता बाजारात हायब्रीड ज्वारीला चाळीस ते पन्नास हजारचे आसपास दर आहे. शाळू, रब्बी ज्वारीचा दरपूर्वी जास्त असायचा, त्याची जागा हायब्रीडने घेतली आहे. शाळू रब्बी ज्वारी सध्या तीन हजार पाचशे ते चार हजार दराने विकली जात आहे. गहू पूर्वीप्रमाणे तीन हजार ते तीन हजार आठशेच्या दराने विकला जात आहे. डोंगरी व कमी पावसाच्या भागात पूर्वी हायब्रीड घेतले जायचे. वाढलेली

असल्यामुळे लोक हायब्रीड ज्वारी उत्पादन घेत आहेत. मागणी लक्षात घेऊन उन्हाळी हंगामात अनेक ठिकाणी हायब्रीडचे उत्पादन घेतले जात आहे. ज्वारीला चांगला दर व कडब्यातून चांगले उत्पन्न मिळत हायब्रीड ज्वारीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे व ग्लुकोज कमी असल्यामुळे पचन चांगले होते. रक्तात शर्करा निर्माण होत नाही. पचनास हलके असल्यामुळे ऊर्जा मिळते. पोटापासून होणारे आजार कमी होतात. बद्धकोष्ठता आजार टाळता येतो. विद्यार्थी व लहान मुले वगळता इतर जण चपाती कमी करुन भाकरीकडे वळलेले दिसत आहेत.

विविध आजारांवर उपायकारक
ज्वारीमध्ये फायबर प्रोटीन, आयरन जास्त प्रमाणात असते. हृदयरोग, थॉयराइड, शुगर, उच्च रक्तदाब यासाठी हायब्रीड ज्वारीची भाकर फायदेशीर आहे. भाकरी मुळे वजन नियंत्रणात राहते भाकरीचे आहारात कायम सेवन असल्यास कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​