Uncategorized

आयपीएलमधील दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या 19व्या हंगामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 26 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे दुपारी सामना खेळवला जाणार होता, तो आता चेन्नईच्या एम. ए चिंदबरम स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. याच बदलानुसार चेन्नई आणि गुजरात यांच्यात चेन्नई येथे 21 मे रोजी संध्याकाळी खेळवला जाणारा परतीचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल आणि हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले. अहमदाबादमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील दोन सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव आणि मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​