Uncategorized

जगातील सर्वात स्वच्छ सरोवर

पाय पुसून पाण्यात शिरतात लोक

न्यूझीलंडचे रोटोमेयरव्हेनुआ हे जगातील सर्वात स्वच्छ सरोवर आहे. वैज्ञानिकांनी याला पृथ्वीवरील आतापर्यंत नोंदविण्यात आलेले सर्वात पारदर्शक नैसर्गिक सरोवर घोषित केले आहे. या सरोवराचे पाणी इतके साफ आहे, की 70-80 मीटरच्या खोलपर्यंतचा तळ स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजेच तुम्ही पात्राखालील खडक, मासे आणि छोटे-छोटे दगडही पाहू शकता. हे सरोवर न्यूजीलंडच्या साउथ बेटावर नेल्सन लेक्स नॅशनल पार्कच्या आत आहे.

हे सरोवर चहुबाजूने उंच-उंच आल्पाइन जंगल, हिमाच्छादित शिखरे आणि घनदाट जंगलाने वेढलेले आहे. येथे पोहोचण्यासाठी कुठलाही रस्ता किंवा वाहन नाही. पर्यटकांना येथपर्यंत येण्यासाठी ट्रेकिंग करावे लागते, जो सुमारे 6-8 तासांचा अवघड ट्रेक आहे. यात पर्वत चढणे, जंगल पार करणे आणि निसर्गाचा पूर्ण सन्मान करणे सामील आहे. हे सरोवर अत्यंत दूरस्थ आणि संरक्षित असल्याने याचे पर्यावरण अत्यंत नैसर्गिक आणि स्पर्श न झालेले आहे.

सरोवराला माओरी समुदाय अत्यंत पवित्र मानतो. त्यानुसार या सरोवराचे पाणी अध्यात्मिक शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. याचमुळे येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बूट किंवा पादत्राणे चांगल्याप्रकारे पुसून घेण्याचे किंवा साफ करण्याची विनंती केली जाते. बूटाला लागलेली किंचित माती, धूळ किंवा बॅक्टेरिया सरोवराच्या पावित्र्याला भंग करू शकते. हा नियम सांस्कृतिक महत्त्व बाळगून आहे, तसेच सरोवराच्या नाजुक इकोसिस्टीमलाही वाचविणारा आहे.

काचेसारखे पारदर्शक

येथे येणारे पर्यटक बोर्डावर लिहिलेल्या नियमांचे पालन करत बूट पुसून घेतात आणि मगच सरोवराच्या काठावर पोहोचतात. वैज्ञानिकांनी अनेकदा या सरोवराचे अध्ययन केले आहे. 2011 मध्ये नेदरलँडच्या वैज्ञानिकांनी येथील पाण्याची पारदर्शकता मोजली आणि दृश्यमानता 76 मीटरपर्यंत असल्याचे त्यांना आढळून आले. नंतरच्या चाचणीत ही दृश्यमानता 80 मीटरपर्यंत नोंद झाली. सरोवराचे पाणी मुख्यत्वे भूमिगत खडकांमधून येत असल्याने हे शक्य आहे. हे खडक नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करतात, जे पाण्याच्या मार्गातील सर्व कण, कचरा आणि जैविक कचरा गाळून घेतात. सरोवरात कुठलाच मोठा इनफ्लो नाही, यामुळे कुठलीच अस्वच्छता पोहोचत नाही. सरोवराचे नाव रोटोमेयरव्हेनुआ हे माओरी भाषेतून आले आहे, याचा अर्थ ‘भूमीचे सरोवर’ आहे. याचा रंग निळा-फिकट हिरवा असतो. येथे पोहोचण्यासाठी सर्वप्रथम मार्ग रोटोइती सरोवरापासून सुरू होतो, मग जंगल आणि पर्वतांमधून ब्ल्यू लेकपर्यंत जाता येते. ट्रेकिंगदरम्यान पर्यटकांना कॅम्पिंगची अनुमती मिळते, परंतु कुठलाच कचरा न टाकण्याचे आणि आग न लावण्याचा कठोर नियम आहे. याचबरोबर सरोवरात पोहण्यावर पूर्णपणे बंदी आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​