Jyotiba temple | चैत्र यात्रेनंतर जोतिबा मंदिरात उद्या ‘पाकाळणी’ विधी; मंदिर दुपारी दर्शनासाठी ‘या’ वेळेत राहणार बंद

जोतिबा मंदिर उद्या बंद राहणार
जोतिबा डोंगर -श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिया डोंगर येथे चैत्र यात्रेच्यानंतर रूढी परंपरेनुसार सोमवारी दि. १३ एप्रिल रोजी जोतिबा मंदिरात पाकाळणी विधी करून मंदिर स्वच्छ करण्यात येणार आहे. यावेळी मंदिराची शिखरे, दीपमाळ, ओवऱ्या, दागदागिने, शस्त्र, अस्त्र, पालखीचे साहित्य, धार्मिक उत्सवाचे साहित्य, चांदीच्या वस्तूची स्वच्छता करण्यात येणार आहे.
तर मंगळवार दि. १४ रोजी परंपरेनुसार ग्रामस्थ पुजारी यांच्यातर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरम्यान शनिवारी श्री जोतिबा देवाची दख्खनच्या राजेशाही रुपातील आकर्षक खडी सुवर्णालंकारित महापूजा बांधली होती. हि पूजा श्रीं चे पुजारी व खंडकरी पुजारी यानी बांधली होती. सोमवारी पाकाळणी विधीसाठी जोतिबा डोंगर येथील मंदिराचे दरवाजे भाविकासाठी पहाटे चार ते दुपारी चार वाजेपर्यंत मंदिर बंद करण्यात येणार आहे. यावेळी श्रीचे दर्शन बंद असणार आहे असे आवाहन समस्त ग्रामस्थ पुजारी व देवस्थान समितीने केले आहे. स्वच्छता करण्याच्या उद्देशाने चैत्र यात्रेनंतर पंधरा दिवसांनी मंदिरामध्ये समस्त पुजारी वर्ग व देवस्थान समिती जोतिबा यांच्या संयुक्त विद्यमाने पाकाळणीचे आयोजन केले जाते. याबरोबरच ही पाकळणी विश्वी वर्षातून तीन वेळा करतात.
यावेळी कोल्हापूरचे मधुकर रामाणेहे आपले ३५० कार्यकर्ते घेऊन व कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन गाडी घेऊन मंदिर स्वच्छतेसाठी पाकाळणी विधीसाठी येत असतात. तसेच यावेळी त्यांच्याबरोबर कोल्हापुरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित असतात. याचबरोबर कोल्हापूर व पन्हाळा महानगरपालिकेची अग्निशमन गाडी, वारणेचा पाण्याचा टँकर फवारणीसाठी असणार आहे.
Source link