Uncategorized

Satara Breaking | निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची कंपनीवर दादागिरी? मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहखात्याला चौकशीचे आदेश

                                      फरासखाना पोलीस ठाण्याचे नाव सांगून ‘वसुली’चा प्रयत्न?

सातारा : खंडाळा तालुक्यातील मावशी येथील औद्योगिक कंपनीत ठेकेदारी काम मिळविण्यासाठी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडून दबाव टाकला जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून, मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेत गृहखात्याला चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून खंडाळा तालुक्यात स्थलांतरित होत असलेल्या ‘बोहर पार्किंग सिस्टीम प्रा. लि.’ या कंपनीत ठेकेदारी कामे मिळवण्यासाठी निवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश राऊत हे दादागिरी करत असल्याचा आरोप जेष्ठ नागरिक ताराबाई दुधाणे यांनी केला आहे.

राऊत हे स्वतःला अद्याप पोलिस सेवेत असल्याचे भासवून कंपनीकडून कामे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. राऊत यांनी एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून कंपनीच्या मालकांवर दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दुधाणे यांचा दिवंगत मुलगा सुभाष दुधाणे यांचा ‘पृथ्वीराज एंटरप्रायझेस’ या कंपनीत सहभाग होता आणि गेली १४ वर्षे संबंधित कंपनीला स्क्रैप पुरवठा केला जात होता. त्यांच्या निधनानंतरही हा व्यवसाय सुरू होता.

मात्र, कंपनी स्थलांतरित होत असताना राऊत यांच्या हस्तक्षेपामुळे दुधाणे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दुधाणे यांच्या तक्रारीनुसार, राऊत हे निवृत्त असूनही स्वतःला पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचे सांगत आहेत. त्यांनी मोबाईलवरील प्रोफाइल फोटोमध्ये पोलिस गणवेशातील छायाचित्र ठेवून ‘महाराष्ट्र पोलिस’ असा उल्लेख केल्याने ते अद्याप सेवेत असल्याचा भास निर्माण होत आहे. दरम्यान, ताराबाई दुधाणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात भेट घेऊन तक्रार सादर केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने गृहखात्याकडे चौकशीसाठी प्रकरण पाठवले असून, संबंधितांना याबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​