Uncategorized

शिवकालीन गढी कामाचा मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा

नांदोस महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल : मंत्री आशिष शेलार

कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील नांदोस गावातील शिवकालीन गढीचे पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन केले जात आहे. या उत्खननात नवनवीन माहिती समोर येत असून त्यातून वेगवेगळे पुरातकालीन अवशेष सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी या कामाचा शुभारंभ सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आमदार डॉ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला होता. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले सांस्कृतिक विभागाचे मंत्री कोकणचे सुपुत्र आशिष शेलार यांनी शनिवार 11 एप्रिल रोजी नांदोस गावात जाऊन शिवकालीन गढीच्या उत्खनन कामाचा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेत कामाची पाहणी केली. यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्री गावडे, विजय निकम, हेमंत दळवी नांदोस सरपंच माधुरी नांदोस्कर, अमोल नांदोस्कर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित काम हे योग्य गतीने व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री शेलार यांनी सूचना केल्या तसेच आपल्या खात्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले या पुरातत्वीय अवशेषांमुळे नांदोस गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध होणार आहे यात शंका नाही सांग विश्वास व्यक्त केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​