नगराध्यक्षा श्रद्धा भोसलेंनी घेतला मासळी मार्केट समस्यांचा आढावा

सावंतवाडी : प्रतिनिधी
मच्छी मार्केटमधील विक्रेत्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगराध्यक्षांनी आज मार्केटला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला मासळी विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन अडचणी, पावसाळ्यात होणारा त्रास आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर चर्चा केली. मार्केटमधील अपुऱ्या सुविधा आणि सांडपाण्याची समस्या विक्रेत्यांनी त्यांच्यासमोर मांडली. यावर बोलताना नगराध्यक्षांनी सांगितले की, “विक्रेत्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे.नवीन कचराकुंडी, विक्रेत्यांना बसण्यासाठी खुर्च्या, फिश मार्केट दररोज स्वच्छ करणे हे आदेश दिले. ही सर्व प्रशासनाची जबाबदारी असून, येणाऱ्या काही दिवसांत यावर ठोस उपाययोजना करण्यात येतील.” संबंधित विभागाला तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी गोविंद गवंडे, विनोद सावंत, मनोज राऊळ, रिजवान शेख व अन्य पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Source link

