Uncategorized

Parth Pawar Sworn in as Rajya Sabha MP

राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरुवार, 9 एप्रिल रोजी संसद भवनात झालेल्या एका छोटेखानी सन्माननीय सोहळ्यात राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर पार्थ यांनी सभागृहातील ज्येष्ठ नेत्यांना अभिवादन केले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, तसेच काँग्रेस नेते जयराम रमेश हेदेखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, पवार कुटुंब आणि पक्ष आता नव्या नेतृत्वाच्या शोधात आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे खंबीरपणे सांभाळली असतानाच आता त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी देशाच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेचे सदस्य म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. याप्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर जबाबदारीची भावना स्पष्टपणे दिसत होती.

वडिलांचे ‘जॅकेट’ अन् वारसा

संसद भवनाच्या भव्य दालनांमध्ये गुरुवारचा दिवस अत्यंत भावुक होता. शपथविधी सोहळ्यादरम्यान सर्वांच्या नजरा पार्थ पवार यांच्या पोशाखावर खिळल्या होत्या. या विशेष प्रसंगासाठी पार्थ पवार यांनी त्यांचे वडील अजित पवार यांची ओळख मानले नेहरू जॅकेट परिधान केले होते. राजकीय वर्तुळात याकडे केवळ एक पोशाख म्हणून नव्हे, तर ‘वारशाचे हस्तांतरण’ म्हणून पाहिले जात आहे. गुलाबी जॅकेट परिधान करून पार्थ यांनी आपल्या वडिलांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि त्यांची कठोर कार्यशैली पुढे नेण्याचा संदेश दिला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​