Uncategorized

लखनौचा केकेआरवर रोमहर्षक विजय

शेवटच्या चेंडूवर लखनौ विजयी : केकेआरच्या पदरी पुन्हा पराभव : सामनावीर मुकुल चौधरीची तुफानी फटकेबाजी

वृत्तसंस्था/कोलकाता

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल-2026 मध्ये आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनौने कोलकाता नाईट रायडर्सला 3 गडी राखून पराभूत केले. लखनौ संघाला विजयासाठी शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज होती आणि 7 गडी बाद झाले होते. अशा परिस्थितीत, मुकुल चौधरीने 27 चेंडूंमध्ये 54 धावांची नाबाद खेळी करून संघाला सामना जिंकून दिला. विशेष म्हणजे, लखनौ आणि केकेआर या सामन्याचा निकाल देखील शेवटच्या बॉलवर लागला. दरम्यान, केकेआर संघाचा हा चार सामन्यातील तिसरा पराभव ठरला आहे. प्रारंभी, लखनौने ईडन गार्डन्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने प्रथम फलंदाजी करत लखनौसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघाला हवी तितकी वेगवान सुरुवात मिळाली नाही. मिचेल मार्श आणि एडन मार्करम जोडीने पहिल्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. मार्करम 22 धावा करून माघारी परतला तर मिचेल मार्शने अवघ्या 15 धावा केल्या. यानंतर कर्णधार ऋषभ पंत अवघ्या 10 धावा करून माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या आयुष बदोनीने 54 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर निकोलस पूरन 13 धावा करून माघारी परतला. शेवटी मुकुल चौधरीने कोलकाताच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. चौकार, षटकारांचा पाऊस पाडताना त्याने संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. मुकुलने 27 चेंडूत 2 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 54 धावांची निर्णायक खेळी साकारली.

केकेआरचा पुन्हा पराभव

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीला आलेला फिन अॅलन अवघ्या 9 धावा करुन माघारी परतला. पण अजिंक्य रहाणेने एक बाजू सांभाळली. त्याने 24 चेंडूंचा सामना करत 41 धावांची खेळी केली. अंगक्रिश रघुवंशीने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करून 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार खेचले. तर कॅमेरून ग्रीनने 24 चेंडूत नाबाद 32, पॉवेलने 24 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी साकारली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​