Uncategorized

Satara political news | साताऱ्यात राजकीय खलबतं? मंत्री गिरीश महाजन आणि उदयनराजेंमध्ये अर्धा तास चर्चा

                             गिरीश महाजन यांनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट

सातारा – राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उदयनराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन महाजन यांचे स्वागत केले.

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास दिलखुलास चर्चा व गप्पा रंगल्या. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे दोघांकडून स्पष्ट करण्यात आले. भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन हे सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी अधिकृतरित्या कोणतीही राजकीय भूमिका समोर आलेली नाही.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​