Uncategorized

तेजस्विता वेंगुर्लेकर यांना राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषद दाणोली गावठणच्या शिक्षिका

सावंतवाडी –

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाणोली गावठणच्या शिक्षिका तेजस्विता देवदास वेंगुर्लेकर यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार ,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे ,सचिन वायकुळे, प्रमोद तमन्नावर ,जब्बार शिकलगार ,श्री. शेख ,सौ.खंकाळ , सौ.सोनकवडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तेजस्विता वेंगुर्लेकर यांच्या 23 वर्षातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा,त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात असलेली त्यांची कामगिरी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि स्पर्धात्मक प्रगतीत असणारा त्यांचे योगदान यांची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दाणोली गावठण शाळेतील मुख्याध्यापक ,सहकारी शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​