Uncategorized

Kolhapur News | कात्यायनी परिसरात KMT बसला अचानक आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला!

कळंबा :  कोल्हापूरहून चुयेकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या केएमटी बसला कात्यायनी परिसरात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस तातडीने थांबवली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून खाली उतरविण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरहून चुयेकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला मंगळवारी कात्यायनी परिसरात आली असता अचानक बसच्या इंजिनमधून धुराचेलोट येऊ लागले. काही क्षणांतच इंजिनच्या भागातून आगीने पेट घेतला. बसमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बस थांबवली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बस थांबवल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनेमुळे काही काळ परिसरात गर्दी झाली होती.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​