‘त्या’ नराधम बापाला कठोर शिक्षाच करण्याची मागणी

बेळगाव : मानवी संवेदनांना हादरा देणारी एक धक्कादायक घटना तालुक्यातील उक्कड येथे घडली. जन्मदात्या बापानेच अवघ्या 14 दिवसांच्या निष्पाप बालिकेची विष देऊन हत्या केली. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. भीमराई भानप्पा चिप्पाडी (रा. भुतरामहट्टी) याने प्रियांका नामक बालिकेचा विष देऊन खून केला. या अमानुष घटनेमुळे बालिकेच्या पालकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला कोणतीही दया न दाखवता कठोर कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच त्याला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, भीमराई याने 17 मार्च रोजी उक्कड गावातील आपल्या पत्नीच्या घरी भेट दिली. बाळाला पाहण्याच्या बहाण्याने त्याने 14 दिवसांच्या कुमारी प्रियांका हिला हातात घेतले. त्यानंतर तिच्या तोंडात विष टाकून तिची हत्या केली. याचा आरोप आहे. यानंतर काकती पोलीस ठाण्यात क्र. 69/2026 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. याबाबत ग्रामस्थ व नातेवाईकांनी तीव्र निषेध नोंदवत आपली संतप्त भावना व्यक्त केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Source link



