हॅरी केनची हॅटट्रिक, बायर्न म्युनिकला जर्मन कपचे जेतेपद

बर्लिन : हॅरी केनने जर्मन कपच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक करून बायर्न म्युनिकला गतविजेता स्टुटगार्टवर 3-0 ने विजय मिळवून दिला आणि आणखी एक देशांतर्गत दुहेरी विजेतेपद खात्यात जमा करून दिले. दुसऱ्या सत्रात केनने केलेल्या गोलमुळे बायर्नच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हे चाहते जर्मन फुटबॉल फेडरेशनच्या सुरक्षा उपायांमध्ये वाढ करण्याच्या योजनेच्या विरोधात स्टुटगार्टच्या चाहत्यांसमवेत निषेध करण्यात सामील झाले होते. मध्यांतरानंतर या निषेधाला सुऊवात झाली. त्यानंतर दोघांनीही स्टेडियमच्या दोन्ही टोकांना मोठ्या आतषबाजीने भरून टाकले आणि संपूर्ण मैदान धुराच्या आवरणाखाली झाकून टाकले. त्यानंतर लगेचच 55 व्या मिनिटाला मायकल ओलिसेच्या क्रॉसवर केनने डायव्हिंग हेडर मारून सामन्यातील कोंडी फोडली.
त्यामुळे बायर्नच्या चाहत्यांनी आणखी फटाके फोडले, ज्यामुळे आधीच खराब असलेली दृश्यमानता आणखी बिघडली आणि खेळ थांबवावा लागला. केनने हाणलेला एक जोरदार फटका गोलच्या आडव्या खांबावर आदळल्यानंतर 80 व्या मिनिटाला लुईस डियाझने दिलेल्या पासवर जाळ्याच्या खालच्या कोपऱ्यात फटका मारून गोल करत त्याने सामन्याचा निकाल निश्चित केला. अँजेलो स्टिलरच्या हँडबॉलमुळे पेनल्टी दिली गेल्यानंतर केनने स्टॉपेज टाइममध्ये पेनल्टी स्पॉटवरून गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. केनने या हंगामात जर्मन कप, लीग, सुपर कप आणि चॅम्पियन्स लीगसह बायर्नसाठी एकूण 61 गोल केले. या गोलांमुळे बायर्नला चार फेऱ्या शिल्लक असतानाच बुंडेसलिगाचे विजेतेपद पटकावण्यात मदत झाली. 2000 नंतर बायर्नची जर्मन कपच्या अंतिम फेरीत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ होती.
Source link



