स्पेनकडून सौदी अरेबियाचा 4-0 गोल्सनी धुव्वा

संपूर्ण सामन्यावर गाजवले वर्चस्व, यामालकडून एक, तर ओयारझाबलकडून दोन गोलांची नोंद
वृत्तसंस्था
अटलांटा : फुटबॉलच्या सर्वांत मोठ्या मंचावर पहिल्यांदाच सुऊवातीच्या फळीत खेळताना किशोरवयीन सुपरस्टार यामालने सामन्याच्या 10 व्या मिनिटालाच गोल केला आणि त्याच्या जोरावर उत्साह वाढलेल्या स्पेनने अटलांटा येथे सौदी अरेबियाचा 4-0 असा धुव्वा उडवत स्पर्धेची दमदार सुऊवात केली.
केप वर्देविऊद्धच्या सामन्यात त्याला केवळ दुसऱ्या सत्रामध्ये बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते, परंतु या सामन्यात त्याला थेट सुऊवातीपासून खेळण्याची संधी मिळाली. त्याने सौदी अरेबियाच्या बचावफळीला वारंवार भेदत आणि मिकेल ओयारझाबलचा क्रॉस गोलमध्ये रूपांतरित करत आपली छाप पाडली. स्पेनचे प्रशिक्षक लुईस दे ला फुएन्ते यांना त्यांच्या या स्टार खेळाडूकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती.
स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या स्पेनला केप वर्देने बरोबरीत रोखल्यामुळे चिंता वाढली होती. कारण 2010 मध्ये विश्वचषक जिंकल्यापासून स्पेनला 16 संघांच्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही आणि या काळात त्यांनी केवळ तीन सामने जिंकले आहेत. पण यामालच्या सुऊवातीच्या गोलने पहिल्या सत्रांमध्ये गोलांचा धडाका पाहायला लावला. केप वर्देविऊद्धच्या सामन्याच्या पहिल्या 30 मिनिटांत चेंडूला स्पर्शही न केल्यामुळे टीकेचा धनी ठरलेल्या ओयारझाबलने केवळ यामालला गोलसाठी मदतच केली नाही, तर 21 व्या आणि 24 व्या मिनिटाला जवळून फटके मारत स्वत:ही दोन गोल केले.
स्पेनची आघाडी इतकी जबरदस्त होती की, प्रशिक्षक दे ला फुएन्ते यांनी पुरेसे समाधान मानत मध्यंतराच्या वेळीच आपल्या या दोन्ही गोल करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावले. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीच्या चार मिनिटांतच स्पेनची आघाडी आणखी वाढली. यावेळी मार्क कुकुरेलाचा फटका हसन अल्तामबक्तीला लागून गेला आणि त्यातून स्वयंगोल झाला.
विश्वचषकात गोल नोंदविणारा आठवा सर्वांत तरुण खेळाडू
18 वर्षीय आघाडीपटू यामालने गोलपोस्टच्या दुसऱ्या टोकाला सरकत येऊन क्रॉस पासचे गोलमध्ये रुपांतर केले आणि विश्वचषकाच्या इतिहासातील तो गोल करणारा आठवा सर्वांत तऊण खेळाडू ठरला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे युरोपियन विजेते असलेल्या स्पेनला पहिल्या सामन्यात केप वर्देने अनपेक्षितपणे 0-0 असे बरोबरीत रोखल्यानंतर यामालच्या या गोलमुळे संघावरील ताण निवळण्यास मदत झाली. लायेनेल मेस्सी, किलियन एमबाप्पे, एर्लिंग हालांद आणि हॅरी केन यांनी या स्पर्धेत दमदार सुऊवात केली असून यामालनेही आपल्या गोलसह या यादीत स्थान मिळवले आहे.
बार्सिलोनाचा हा विंगर आधीच जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक मानला जात असून अवघ्या 16 वर्षांचा असूनही त्याने स्पेनला 2024 ची युरोपियन स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यानंतर खेळातील सर्वांत मोठा स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. परंतु धोंडशिरेच्या दुखापतीमुळे हंगामाचा शेवटचा टप्पा त्याला मुकावा लागल्याने विश्वचषकापूर्वी त्याच्या तंदुऊस्तीबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
Source link



