Uncategorized

सूर्यासोबत झळकणार कायाडू

होम्बले फिल्म्सकडून नव्या चित्रपटाची घोषणा

दक्षिणेतील दमदार अभिनेता सूर्याचा ‘करुप्पू’ चित्रपट यशस्वी ठरला आहे. याचदरम्यान त्याला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. होम्बले फिल्म्सने अधिकृतपणे स्वत:च्या पुढील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची घोषणा केली असून यात सूर्या महत्त्वाच्या भूमिकेत असेल तर त्याच्यासोबत कायाडू लोहार नायिका म्हणून झळकणार आहे. या चित्रपटाला साई. अभ्यंकर याचे संगीत लाभणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यात आले आहे. कायाडू लोहारसाठी हा चित्रपट अत्यंत मोठी संधी ठरणार आहे. कायाडूने यापूर्वीच स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली आहे. आता तिला सूर्यासोबत काम करता येणार असल्याने तिच्या अभिनयाचा कस लागणार आहे. सूर्याने 2 दशकांपेक्षा अधिक काळात स्वत:च्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 7 फिल्मफेयर पुरस्कार पटकाविणाऱ्या सूर्याने नेहमीच व्यावसायिक यश आणि दमदार कथांदरम्यान एक उत्तम संतुलन राखले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​