Uncategorized

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावे : सुरेश गवस

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी जिल्ह्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश गवस यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सावंतवाडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पक्ष संघटना, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि आगामी काळातील पक्षवाढीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना सुरेश गवस म्हणाले की, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वेळ देणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांशी संवाद वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यास जिल्ह्यात पक्षाचे संघटन अधिक प्रभावीपणे उभे करता येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्ष संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने मालवण तालुक्यातील आडवली येथील सतीश कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सुनंद सिताराम कदम, अमोल कदम, राजेंद्र कदम आणि संजय जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पक्षाच्या सावंतवाडी येथील कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.

या वेळी उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यावर भर देण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीस सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मघेंद्र देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष रामभाऊ सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, संदीप राणे, शिरोडकर, विजय कदम, गुरुदत्त कामत, सत्यजीत देशमुख, ॲड. चेंदवणकर, लक्ष्मण गवस, धर्मजी गावडे, प्रभाकर गावकर, सतीश नाईक, रिध्दी परब, रोहन परब, नितेश पाटील, शशिकांत तळावणेकर, विलास पावसकर, ऑगस्टीन फर्नांडिस, प्रकाश गावडे, डॉ. तुषार भोसले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​