Uncategorized

Koyna Wild life | हिरव्यागार जंगलात चमकतोय सोन्यासारखा हळद्या; कोयनेत पक्षीप्रेमींची भुरळ

कोयनानगर : कोयनेच्याघनदाट जंगलात व पाणलोट क्षेत्रातील अभयारण्यात अढळणारा निसर्गाचा पिवळा धमक दागिना म्हणजे हळद्या पक्षी. हळद्या आपल्या आकर्षक रंगामुळे हिरव्या गर्द झाडीतून उठून दिसतो. निसर्गाची पंढरी असणाऱ्या कोयना परिसरात विविध प्रकारचे व वैशिष्ट्यपूर्ण पक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे या परिसरात अनेक पर्यटक, पक्षीप्रेमी व पक्षी निरीक्षक पक्ष्याचा अभ्यास करण्यासाठी येतात. त्यांना हा पिवळा धम्मक हळद्या आपल्या आकर्षक रंगाची भुरळ घालतो व आपल्या मधुर स्वरांनी आकर्षित करीतअसल्याचे पक्षीप्रेमी व पर्यटक सांगत असतात.

निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या कोयना परिसरात अनेक सुंदर आणि रंगीबेरंगी पक्षी पहायला मिळतात. यापैकीच एक अत्यंत देखणा आणि मनाला भुरळ घालणारा पक्षी म्हणजे हळद्या पक्षी. आपल्या गडद पिवळ्या रंगामुळे हा पक्षी झाडांच्या हिरव्यागार पानात अगदी एखाद्या सोन्याच्या दागिन्यासारखा चमकतो. हळद्या पक्ष्याला दुरून पाहिले तरी त्याचा रंग चटकन लक्ष वेधून घेतो. पूर्ण वाढ झालेल्या नर पक्ष्याचा रंग विलोभनीय आणि चमकदार पिवळा असतो. त्याच्या पंखांचा आणि शेपटीचा रंग मात्रफिक्कट काळा असतो, ज्यामुळे पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो. त्याच्या डोळ्यांभोवती एक काळी पट्टी असते जी डोळ्याच्या मागेपर्यंत जाते. त्याची चोच लांबट आणि फिकट गुलाबी-लाल रंगाची असते.

हळद्या पनी जितका दिसायला सुंदर आहे, तितकाच त्याचा फिक्कट काळा असतो, ज्यामुळे पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो. त्याच्या डोळ्यांभोवती एक काळी पट्टी असते जी डोळ्याच्या मागेपर्यंत जाते. त्याची चोच लांबट आणि फिकट गुलाबी-लाल रंगाची असते. हळद्या पनी जितका दिसायला सुंदर आहे, तितकाच त्याचाआवाजही गोड आहे.

हे पक्षी बहुतांश वेळा झाडांच्या उंच शेंड्यांवर किंवा दाट पानांमध्ये लपून राहतात, त्यामुळे ते सहज डोळ्यांना दिसत नाहीत. परंतु, त्यांचा बासरीसारखा अतिशय मधुर आणि शिट्टीसारखा आवाज ऐकून जंगलात किंवा बागेत त्यांची उपस्थिती सहज ओळखता येते. हळद्या पक्ष्याची घरटे बांधण्याची पद्धत अतिशय कौतुकास्पद व विलक्षण असते.हळद्या हा कीटकभक्षी आणि फलाहारी पक्षी आहे. झाडांवरील लहान किडे, अळ्या, मध, तसेच बड, पिंपळ, अंजीराची फळे आणि विविध प्रकारची बोरे हे त्याचे आवडते अन्न आहे. मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत हा पक्षी मोठ्या प्रमाणावर दिसतो. हिवाळ्यातील कडक थंडी सुरू होण्यापूर्वी हे पक्षी भारताच्या दक्षिणेकडील उबदार भागांमध्ये स्थलांतर करतात.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​