Uncategorized

सावंतवाडीत मध्यरात्री वादळी पावसाचे थैमान

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी शहरात  गुरुवारी मध्यरात्री विजेच्या गडगडाटासह  वादळी वारा आणि पावसाने  थैमान घातले.यात मोठी हानी झाली . सुमारे तीन तास वीज पुरवठा झाडांच्या  फांद्या  पडल्याने खंडित  झाला होता. वाऱ्यांमुळे झाडे पडण्यासह पत्र्याची शेड उडून गेल्याचे प्रकार सावंतवाडीत घडले . मात्र ,कोणतीही जीवितहानी झाली नाही.गुरूवारी सायंकाळपासून तालुक्यात वीजांचा लखलखाट सुरू होता. आंबोलीत देखील पाऊस पडला. यातच रात्री १२  वाजण्याच्या  सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिव उद्यान परिसरातील झाडे पडण्यासह  एका इमारतीवरील पत्र्याचे छत उडून गेले.  एसपीके कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले. रात्रीची वेळ  असल्याने जिवीतहानी झाली नाही. रात्री तीन तास विद्युत पुरवठा देखील खंडीत होता. शहरात आणखीनही काही ठिकाणी या वाऱ्याने नुकसान केल्याचे समजते.मोती  तलाव काठावरील अशोकाची  झाडे  उन्मळून  पडली.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यात मोठे नुकसान झाले आहे. जुन्या इमारतीच कौलारू छत तसेच नवीन इमारतीचे पत्रे तुटून पडले आहेत .वाऱ्याचा वेग एवढा होता की तीन मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडले. रामेश्वर प्लाझा येथील काचेच्या खिडक्या फुटून नुकसान झाले. राजवाडा येथील नारळाचे झाड पडून संरक्षक कठड्याचे व शिवउद्यानमधील झाडाचे नुकसान झाले. उभाबाजार येथील छताचा पत्रा शेजारील इमारतीच्या अंगणात जाऊन पडला. आरपीडी कॉलेजच्या जाहिरात कमानीचेही नुकसान  झाले आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​