Uncategorized

‘शिवम’वरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित नाही

पालकमंत्री जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण

बेळगाव : शिवम असोसिएट्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सरकारने अधिकृतपणे सीआयडीकडे सोपविली आहे. एक-दोन दिवसांत संपणारी ही चौकशी नाही. अधिकारी सखोल चौकशी करीत आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. रविवारी एका खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, सीआयडी चौकशी सुरू आहे. ती पूर्ण होऊन अहवाल आल्यानंतरच निश्चित माहिती व सत्यासत्यता समजणार आहे. या कारवाईमागे राजकीय कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, विनय नावलगट्टी, सुनील हणमन्नावर, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते.

पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या व गुंतवणूकदारांच्या हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे कारवाईसंबंधी होत असलेला राजकीय आरोप चुकीचा आहे. नियमबाह्या आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा प्रेरणा नाही, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडून कष्टाने कमावलेला पैसा अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करू नये, गुंतवणूक करताना नागरिकांनी सावध पावले उचलावीत, कोणत्याही संस्थांकडून नियमबाह्या व्यवहार किंवा जास्त नफ्याचे आमिष दाखवले गेले तर नागरिकांनी अशा संस्थाच्ंया भूलथापांना बळी पडू नये, फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर कारवाईबरोबरच जागृतीचीही गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीसंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, निवडणुका संपताच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व अत्यावश्यक वस्तूंची दरवाढ केली आहे. हे काही नवे नाही. त्यांची ही जुनीच सवय आहे. दरवाढीमुळे सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. भाजपने जागतिक संकट व विकासाच्या नावाखाली दरवाढीचे समर्थन करणे चुकीचे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

आयपीएस अधिकारी संदीप पाटील लवकरच रुजू होतील

दक्ष आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांची बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी अलीकडेच बदली झाली आहे. बदलीप्रक्रियेत आणखी काही बदल झाले आहेत का? असे पत्रकारांनी विचारताच संदीप पाटील लवकरच रुजू होतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​