Uncategorized

वेंगुर्ले ते मार्लेश्वर बस 24 आँगस्टला निघणार

वेंगुर्ले (वार्ताहर)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला आगारातर्फे शिवक्षेत्र मार्लेश्वर दर्शनासाठी खास श्रावण महिन्यातील सोमवार दि. 24 आँगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता वेंगुर्ले दाभोली मार्गे मार्लेश्वर (संगमेश्वर) अशी बस सोडण्यात येणार आहे. हि बस मार्लेश्वर येथून दुपारी 3 वाजता वेंगुर्ला येथे जाण्यासाठी निघणार आहे. या देवदर्शन प्रवासी बस चा भाविक प्रवाश्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी केले आहे.
या बस मधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची अधिक माहितीसाठी व आपली नावनोंदणी करण्यासाठी नवज्योत गावडे 9371911073 यांच्याकडे संपर्क साधावा.
या बस मधून प्रवास करण्याऱ्या 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास, महिला व 65 वर्षावरील नागरिकांना हाफ (अर्धे) तिकीट तर उर्वरीत प्रवाशांना फुल (पुर्ण) प्रवासी भाडे द्यावे लागणार आहे. जाण्याचे प्रवासी फुल तिकीट रु. 900/- एवढे आहे. तेवढेच प्रवासी भाडे येताना भरावे लागणार आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी या खास बस सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​