विलवडे पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवासह प्रशस्त सभागृह ग्रामीण सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे गौरवोद्दगार!
ओटवणे प्रतिनिधी
आजच्या काळात ग्रामीण भागात विश्वासार्हता टिकवून ठेवणे कठीण असताना सामान्यांचा विश्वास संपादन विलवडे सारख्या ग्रामीण भागातील छत्रपती शिवाजी पतसंस्था रौप्य महोत्सव साजरा करत आहे हे सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. या गावाच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले असुन कृषिक्रांती साधलेल्या विलवडे गावाने सहकार क्षेत्रात सर्वांसाठी आदर्शवत काम केले आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी विलवडे येथे केले.विलवडे येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव आणि बहुउद्देशीय सभागृह उदघाटन कार्यक्रमात प्रमोद कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी उपसभापती विनायक दळवी, कृष्णा सावंत, सरपंच प्रकाश दळवी, पतसंस्था अध्यक्ष प्रदीप दळवी, उपाध्यक्षा साक्षी गावडे, विलवडे वाचनालयाचे अध्यक्ष राजाराम दळवी, भालावल उपसरपंच समीर परब, माजी सरपंच मोहन दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकार हा ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीचा कणा असून विलवडे पतसंस्थेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले. तसेच सहकार क्षेत्राच्या बाबतीत ग्रामीण भागात विलवडे गावाने नवीन पायंडा उभारल्याचे सांगितले. तसेच सुशांत नाईक यांनीही विलवडे गावच्या एकीचे कौतुक करत पतसंस्थेने स्वतःचे सभागृह साकारून गावाच्या विकास प्रक्रियेत मानाचा तुरा रोवला असल्याचे सांगून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप दळवी यांनी पतसंस्थेने केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच ग्रामस्थांची गरज ओळखून या सभागृहाची संकल्पना राबवण्यात आली. भविष्यातही गावच्या विकासासाठी संस्था कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याहस्ते फीत कापून पतसंस्थेच्या पंचमाता स्तुती बहुउद्देशीय उभारलेल्या सभागृहाचे उदघाटन करण्यात आले. या सभागृहासाठी सीता सावित्री वाचनालयाचे अध्यक्ष राजाराम दळवी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. याबद्दल त्याचा जिल्हा बँक अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संस्थेच्या आजी माजी अध्यक्षांसह संचालक तसेच या संस्थेसाठी जमीन विना मोबदला दान देणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, संस्थेचे सचिव सोनू दळवी, माजी अध्यक्ष आनंद दळवी, हरिश्चंद्र दळवी, परेश धर्णे, आत्माराम दळवी, लिपिक सदाशिव दळवी, सखाराम दळवी, आत्माराम दळवी, सदाशिव दळवी, महेंद्र नाईक, गोपाळ दळवी, भागू लांबर, प्रफुल्ल सावंत, सुरेश सावंत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे माजी अध्यक्ष विलास गावडे तर आभार सरपंच प्रकाश दळवी यांनी मानले.
Source link


